तुला राहील नेहमी माझी साथ आभाळाला जशी सूर्याची साथ जंगलात मृगराजाची बरसात कोकिळेच्या गाण्यातला मधुर आवाज खोल समुद्रातील शिंपल्यांची कर्तबबाज वसंत ऋतूमधली हिरवडी पाण्यावर खिळणारी सरोजकळी उन्हाळ्यात उठणारा गुलमोहर युध्दात कमी झोपणारा लोहार सैनिकाच्या खांद्यावरची बंदूक सावकाराच्या घरची संदूक घसरणाऱ्या म्हातार्याची काठी गश्तीमध्ये पोलिसांची लाठी सर्वांचा जसा एकमेकांना हात तसच तुला राहिल नेहमी माझी साथ - खुशाल भोयर
Our words will express your feelings.