ती ..
कोणाला नाही आवडत आपल बालपण.???
प्रत्येकजण बोलतेय,
लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा'
पण, कुणी ते बालपणच हिरावून घेतल तर.???
होय, माझ बालपण हिरावलय...
बालपणात हरवलेली मी, किती सुंदर जग होते,
माझ्या स्वप्नाच्या दुनियेत आनंदाचे क्षण होते...
ना कुठली चिंता, ना कसली काळजी,
मनसोक्त खेळणे आणि स्वछंद भरारी...
मी बाबांची परी आणि आईची लाडली,
दादासोबत भांडत - खेळत प्रेमाने फुलली...
मित्र - मैत्रिणींसोबत जमलेली माझी गट्टी,
जणू हेच सर्व माझी विश्वनगरी...
परंतु, एके दिवशी झाले असे,
मी चुकली वाट की नशिबच थोडे होते.???
जीवनातला तो शेवटचा काळा दिवस होता,
माझ्या मनाविरुद्ध सोबत घेऊन जात होता...
मी शाळेच्या वाटेला निघाली,
मध्येच काका मला अडवी,
मला सोबत चालायला लावी...
मी नाही म्हटल्यावर मला उचलून घेई,
काय चुकी माझी, सांगा ना कुणीतरी.???
आई ग,
ऐक ना, तू रडू नकोस
खुप घाबरली होती मी,
ओरडायला पण जागा उरली नव्हती,
माझ्या तोंडामध्ये काहीतरी कोंबून का ते काका मला घेऊन जाई.???
काय चुकी माझी, सांग ना ग आई.???
आई,
अंधाराची वाट होती
माझ्या डोळ्यांना पट्टी होती,
श्वास घ्यायला जागा नव्हती
पण मी काहीही करू शकत नव्हती...
त्या काकानी असे का केले ग आई.???
काय चुकी माझी, सांग ना ग आई.???
काय झाले मला काही कळलेच नाही,
तहानेने जीव कासविस झालेला
पाणी पाहिजे होते ग,
पण काकानी दिलेच नाही...
माझा श्वास थांबत चाललेला,
पण काकाना काळजी नाही...
काय चुकी माझी, सांग ना ग आई.???
माझे अंग दुखायला आले आई,
पण अंगावरती कपडा नाही...
अखेरचा तो श्वास माझा
आईबाबाचे नाव ओठी,
पण शब्द बाहेर पडलेच नाही...
काकाना तर माझी काळजीच नाही
मला एकटीला सोडून का निघून गेले ग आई.???
काय चुकी माझी, सांग ना ग आई.???
तु बोल ना ग आई
तु बोलत का नाही.???
नको रडूस ग तु आई,
मी कधीच काकासोबत जाणार नाही...
दादापण का रडतो आहे ग आज,
माझ्याशी भांडत का नाही.???
बाबा बोला ना तुम्ही तरी,
मी तुमचीच आहे ना परी...
मला नको चॉकलेट बिस्किट्,
ना करणार कधी हट्ट...
पण आज मला तुम्ही,
मिठीत घ्या ना पकडून घट्ट...
काय चुकी माझी, सांग ना कुणीतरी.???
शाळेत काही चुकल्यावर,
मैडम शिक्षा करतात...
तसे काकाला कोणी करणार का ग आई.???
आज का सगळे गप्प गप्प
कुणी माझे ऐकत का नाही.???
बोला ना कुणीतरी
माझा आवाज़ कुणी ऐकत का नाही.???
काय चुकी माझी सांगा ना कुणीतरी.???
- श्रुती नासरे
Shruti your poem is too heart touching and meaningful. You described the real condition of our society. I'd love to read more poems of you. So, please make more poems like that & keep it up dear. And all the best.
ReplyDeleteYes, I have tried to write this poem based on the real things that have happened in the lives of such girls in the society. Thank you very much. Your encouragement will help me rewrite. 😊🙏
DeleteKhup chhan lihalay Shruti ...👍
ReplyDeleteThank you so much sir🤗🙏
DeleteShruti, I have no words left.... 👌👌👌👌👌
ReplyDeleteKhup khup mast lihlay g Tu.... 😀😀👍👍👍
Thank you so much 😊😊🙏🙏
Delete