बाबा
" कसं सांगू मनातलं मला कळतच नाही...
जेव्हा कुणीतरी विचारायचं लहान असताना कोण आवडतं जास्त आई की बाबा.....
म्हणायचो आपण आवडतात दोघेही एक समान......
काळाच्या ओघात आपण वाहत जातो आणि वयानं मोठं होत जातो ..
मोठे होत असताना आपण आईजवळ आपलं प्रेम नेहमी व्यक्त करतो पण बाबांसोबत बोलताना जरा मोजकच बोलतो...
प्रेम, जिव्हाळा असतो सारखाच पण व्यक्त करताना मात्र नेहमी मागेच पडतो....
पण आज मी बोलू इच्छितो.. मनातलं माझ्या सांगू इच्छितो..
बाबा.. माहित आहे मला... "
भलेही तुम्ही रागवत असाल आम्हाला लहानपणी
पण होती ती तुमची वणवण आम्हाला सुधरवण्यासाठी
जर रडलोच तर तत्परतेने पाठवायचे आईला सांत्वनासाठी
कारण माहित आहे मला,आहात नारळाच्या फळाप्रमाणे तुम्ही !!
गमती जमतीत भाग जरा घ्यायचे तुम्ही कमीच
बलिदानाच आहे हे तुमचं आम्हाला वळण लावण्यासाठी
कधीकधी मध्ये येऊन थांबायचे हे आमचा वेळ वाचवण्यासाठी
कारण माहीत आहे मला, आहात एक शिक्षक सुद्धा तुम्ही !!
कठोर नियमांचं पालन करायला लावायचे तुम्ही नेहमी
स्वतःलाच बदलून घेतलं तुम्ही आम्हाला घडवण्यासाठी
झोकून दिलं स्वतःला तुम्ही आमच्यासाठी
कारण माहित आहे मला, आहात चंद्रगुप्ताचे चाणक्यही तुम्ही !!
पाकिटातल्या पैशांना सीमा आखली स्वतःसाठी
बचत होती ती तुमची सुंदर भविष्यासाठी
मात्र विचार नाही व्हायचा कधीही आमच्या खर्चासाठी
कारण माहित आहे मला, ठेवलं आम्हाला पुढं स्वतःआधीही तुम्ही !!
मोजता येणार नाही आहे एवढ्या असंख्य गोष्टी
परतफेड ज्यांची या जन्मात तरी करता येणार नाही
केलय अपारंपार प्रेम आमच्यावर तुम्ही
कारण माहित आहे मला, आहात बाबाच्या रूपात देवच तुम्ही !!
- खुशाल भोयर
👍👍👍
ReplyDeleteThanks 😊
Delete🤞🤞🤞
ReplyDeleteThanks 😊
DeleteNice lines bro, heart touching.... Good job.... Keep it up
ReplyDeleteThanks di 😊
DeleteAwesome yaar.... So emotional n touchy.... Aankhe bhaar aai padhte padhte... 😍😍👌👌👌👌
ReplyDeleteThank you so much !! 😊
Delete