फक्त तु होता
तु चुक होता कि भुल होता
वा कधीच संपलेला सुर होता
तु जगण्याचे कारण कि निद्राभंगाचा दोष होता
तु स्वप्नातले माझे गाव नाही मग आवारात का उभा होता
तु अश्रूंची साथ असुनी दोष माझ्या कपाळी का होता
तु भातुकलीचा राजा नव्हता मग का वचनात अडकला होता
तुच धडपडला प्रेम मिळवण्या ह्या तुटल्या जिवा हे का सांगण्या आला होता
माझे घाव तुला दाखवलेच नाही, कारण तु डोळ्यातल्या पाण्याचा समुद्र घेऊन आला होता
तु सहजशी कुणाचा झाला, अन माझ्या विना राहण्याचे पुरावे संपवत होता
तुझ्या मनाचा तोल सांभाळताना माझ्या भावनांनी पराजय स्विकारला होता
तु एकदा तरी वळून पाहायचे तुझ्यात अडकलेला श्वास थांबला होता
प्रेम करने कि तुझ्या संग उडणे कुठला निर्णय चुकला होता
विरहचं मान्य होता तर का आठवणींचा कळस मांडला होता
तु जा स्वच्छंद हो ,पण तुझ्या सोबतीच्या प्रवासाचा रस्ता अजूनही तसाच होता
तु कोरलेल्या खडकावर मी तिथेच होती , तु मात्र कायमचा पुसट झाला होता !!!!
-Vaishnavi Napte
Awesome as always💞
ReplyDeleteThank you ☺☺
Deletevery nice blog......
ReplyDeleteplease visit my blog also
https://kidscricketcoaching.blogspot.com/2020/05/episode-15-back-foot-defense-drill.html
Thank you so much !! 👍
DeleteAmazing poetry dear 👌😊
ReplyDeleteDepicts deep love for someone from the lover ...
Nice creation 🍀😊👌🤘
Thanks dear 😃😃
Delete