पापा ची खळगी भरून फक्त पैशाचं कमावला जाता जाता
आरं एवढा कसा स्वार्थी झाला तू
जन्माला यायचं उद्देश विसरला तु
नात्यात कोणाचा कुणी नाही राहला तु
दान तर जमना पण दुसऱ्याच्या तोंडातला घासही घेतो खाता खाता
माणुसकी नावाचं औषध संपलय रे आता।
सुंदर श्रुष्टी पाह्यली नव्हं, अनं मी मी च करत राह्यला
जाताना साडे तीन हाताच्या जागेत संपणारा,लोकांच्या जमिनी उबाडत राह्यला
गरजुला हात तर नाही दिला ,अनं त्यांच्या दु:खात सुख मानत राह्यला
कुणाच्या अश्रुला हसणारा तु ,कुठल्या राक्षसाचा हात पकडुन आला जन्माला येता येता
माणुसकी नावाचं औषध संपलय रे आता।
स्वत:च नाव हि तुज नाही मग काय कमवायला पळत असतो
कौतुक करनं मुळात जमतच नाही, तरी नुसत्या टिका करत फिरत असतो
हिमतीच्या बढ्या मारनारा तु, जखमे न विव्हळनार्याचे फोटो काढत असतो
क्रूतघ्न असलेल्या नरा ,कसली स्वतः ची थोरवी सांगतो गाता गाता
माणुसकी नावाचं औषध संपलय रे आता।
कामापुरत वापरून फेकायला कुणाचं आयुष्य खेळण वाटत का तुला
पुढे साखरेहुन गोड बोलुन, मागे खंजीर खुपसायची लाज कशी वाटु नये तुला
जन्मदात्यांची सेवा नाही करता आली, व्रूधाश्रमाचा मार्ग दाखवताना जगायची इच्छा तरी कशी होते तुला
जिच्या कुशीची पांग फेडता आला नाही, काय आशिर्वाद देईल ती माता
माणुसकी नावाचं औषध संपलय रे आता।
डोळे उघडून बघ जरा, उगवत्या सुर्याच सुख कळलं
अंहकार फेकून कुणाच्या मनाला जप खर प्रेम कळलं
मायभूमीच्या कार्याला हातभार लाव, जगण्याचं सार्थक कळलं
खाली हातान आलेल्या तुला निदान पुण्याचं गाठुड तरी सोबत येईल नेता
माणुसकी नावाचं औषध संपलय रे आता।।।।।।।।
- वैष्णवी नप्ते
Kharach... Manusaku navach aushadh sampalay.. Kalyug aalay ..
ReplyDeleteNice creation 👌🤘😊🍀
Hmm 😕.. Thank you 😊😊
Delete