चाहुल लागताच चेतक गातोय संकेतगीत
सनातन आहे हे वाळवंटी स्वरूप संपण्याचे वनगीत
वचन आहे सृष्टीचे अवघड दिवस हे ग्रीष्माचे संपणार
प्रकृतीत ओलावा वसंत ऋतूचा पुन्हा सर्वत्र पसरणार !!
अचानक मौसमी वारे नाच कराया लागतील बेधुंद
अल्पावधीत फुंकेलं उष्ण मातीला सुगंध
बहरतील ऊसर भूमी पळवूनी दीर्घ दुष्काळ
सप्तरंग सुंदर सुशोभित करेल आभाळ !!
मुसळधार धारा जमीनीवर पोहचताच शोधतील वाट
ओलीचिंब पावन धरती भुलवतील साऱ्यांना वनवाट
झरे,नदी,नाल्या जन्म घेतील वसुंधरेच्या पोटाऱ्यात
तृप्त करेल तृष्णा भेटता गरजू वाटसरू रस्त्यात !!
मंत्रमुग्ध करतील मधुर पक्ष्यांची किलबिलाट
साक्षात्कार कसा, राहील पुढं हिरव्या निसर्गाची लाट
खळखळत्या दुग्धमय धबधब्याचा पसरेल दाहीदिशा नाद
सृष्टीच्या गाभाऱ्यात साठेल संगीताचा अमृत संवाद !!
समृद्धीचा शंख ऐकून बोलू लागेल सुंठ
हिरवागार निसर्ग आणेल धरतीवर वैकुंठ
स्वर्गमय आभास होईल व्याकुळ वनचरांना
आनंदोत्सव तर आहेच प्रथा प्रखर शरद ऋतू संपताना !!
- खुशाल भोयर
अप्रतिम रचना
ReplyDeleteThank you !!
DeleteWow ..words👌👌
ReplyDeleteThank you !! 🙂
Delete😍😍😍
ReplyDelete😃😄😄
DeleteWow khushal, you are so smart.. Mumma will be proud of you
ReplyDeleteThank you !! 😂
Delete