Father's Day
सूर्यग्रहण आणि छोटस
आनंदाचे क्षण आज
एकाच दिवशी आले ..
कळलं तर असेलच
कुठला आनंद बोलतोय मी
हा अगदी बरोबर ओलखल
Father's Day .. 🙌😚
पण कधी हा दिवस सोडून
आपण बाबांची परवाह करतो का
माझं उत्तर विचारलं तर
खरच सांगेन मी तर नाही करत ..
हा कदाचित काहींना
माझं उत्तर पटलं नसेल
आणि साहजिकच आहे
कोण असेल जो स्वतः सांगेल
की मी स्वतः च्याच बाबांवर
प्रेम नाही करत ..
पण मला असा वाटत
मी आजपर्यंत एक
चांगला मुलगा बनू शकलो नाही
का माहिती कस पण
आज ही तो थकलेला चेहरा आठवतो
ज्या साठी मी सोशल मीडिया वर गाजावाजा करन
सोडून साधं थकवा दूर करण्याचं प्रयत्न पण नाही केलं
त्या घाम आलेल्या चेहऱ्यावर
कधी प्रेमाची फुंकर पण नाही मारली
ना कधी दुःखत असलेल्या पायावर
तेल लावून मालिश पण नाही करून दिली
एवढंच काय हो स्वतः नवीन कपड्यांसाठी नेहमी हट्ट केलं पण कधी बाबांना बाबा तुम्ही हे फाटलेल्या कपड्यात का असता विचारण्याची तसदी पण नाही केलं त्यानं काही घेऊन देणं तर दूरच राहिलं
हा हो मी पैशाने हतबल होतो इथपर्यंत ठीक होत
पण वेळेत पण हतबल झालो तेव्हा माझी मलाच लाज वाटायला लागली हो.
आजही आठवतो मला तो दिवस जेव्हा मला उपचार करून घेण्यासाठी पण आपली ऐपत नव्हती पण स्वतच्या जीवाची पर्वा न करता जेव्हा तुम्ही माझ्या साठी पैसे जमवले...
मी काय केलं हो तुमच्या साठी तुमचा लेक म्हणून
काहीच नाही नुसता बघत बसलो आणि आता पण आहे मठ्च अगदी त्या हाक न ऐकणाऱ्या देवासारखा...
मला देव आहे की नाही हे तर माहिती नाही पण तुमच्या अस्तित्वात असताना मला कुठल्या देवाची गरज नाहीं
हो माहितेय मला मी आता पण स्वार्थीच आहे,
नुसता स्वतः पुरता विचार करत असतो
पण ऐका हा तुम्हाला जी जागा आहे ना ती माझ्या हृदयात दुसऱ्या कोणासाठी नाही आहे..
तुमच्या बद्दल जेवढं लिहावं तेवढं कमी
कारण तुम्हीच तर दिली मला आयुष्यात जिंकण्याची हमी ..🙌🙌
- निखिल वासनिक
रडवलास निखिल तू. ते बोलणे, वागणे, त्यांच्याशी आपला व्यवहार आठवला की डोळ्यात आठवणी तरंगायला लागतात. आई येवढं बाबांविषयी बोलत नसतो.. पण त्यांची कमी भासली की बाबांचं नसतेपण अख्खं आयुष्य पोखरतं��
ReplyDeleteखुप छान लिहिला निखिल
Bhai .. ekdam barobar..
ReplyDeleteAaple wadil evadh kartat aaplyasathi pan aapan tya manane seva nahi karat tyanchi ..
Nice creation 👌🍀👍💓