Skip to main content

GALLI SHALA ...

      मला आनंद हवा होता आणि  त्यांना शाळा!#गल्ली शाळा

  ते मला रोज विचारतात,तुला काय मिळत यांना गोळा करुन, यांचा अभ्यास घेऊन,हे काय नाटक लावले,किती गोंधळ घालतात हे!
     जो तो आज टेंशन अनुभवतो,भविष्याची चिंता आणि चिंतेसोबत आलेलं नैराश्य. शाळेला शिक्षक नाही,दळणवळणाला साधन नाही,हक्कानं बसून बोलायला जागा नाही,आणि प्रत्येकाच्या नजरेत संशयाच वार. या सगळ्यात प्रत्येक व्यक्तींनी आपल्या रीतीने आपली धोरण आखली,कुणी वाचन करताय,कुणी घरकामात वेळ देताय,कुणी वेबिनर बघताय,कुणी छंद जोपासतंय.
   हे सगळं सुरू असताना एक छोटासा विचार या युवक मनात आला. हा बालमनाशी निगडित असलेला विचार आचरनात आणला.
            आज फोनवर एक मित्राशी बोलताना,तो विचारतो,काय ग कुठले workshops घेतेय मुलांचे? मी म्हटले;काही नाही रे,मुलांना घेऊन बसते विरंगुळा म्हणून- अस casual उत्तर दिलं मी त्याला.  तो पुन्हा म्हणतोय पण खूप आवडल रे हे उपक्रम,किती मस्त वाटत बघूनच,कस काय करते तू,आणि कुठे घेते त्यांचे क्लास?
           माझं यामागचं स्वार्थी उत्तर खूप सुंदर आहे,नक्कीच वाचायला आवडेल तुम्हाला-" ज्यांना मी घेऊन बसते ती माझीच आजूबाजूची छोटी बहीण भावंड,त्यांना जाणून घायला मज्जा येते, त्यांच्याशी एक तास जरी घालवला ना तर खूप relax वाटत,त्यांचे प्रश्न हे खरंच विचारात पाडतात, ती तर संपूर्ण वेळ हसवतात,यांच्याशी बोलणं म्हणजे जणू स्वतःशी बोलणं,स्वतःला जाणून घेणं. यांना छोटीशी चांगली गोष्ट शिकवली आणि त्यांना ती वळली तर स्वतःला शाबासकी द्यावी वाटत,"
          आपल्या शरीरात dopamine, serotonin, endorphin नावाचे हार्मोन्स जे आपल्याला आनंदी आणि निरोगी राहायला मदत करतात ते मला यांच्याशी वेळ घालवला की मिळतात. यांना आज कोणते खेल खेळवायचे ,या विचाराने माझा बुद्धीला चालना मिळते,माझं रोजच एक नवीन creative प्लांनिंग बनतं ,आम्ही मिळून ते पूर्ण करतो. रोज आम्ही एक स्टोरी वाचतो(तोत्तोचॅन),कधी आम्ही चर्चा करतो,तर कधी नक्कल,कधी वादविवाद,तर कधी  लेखन तर कधी वाचन,कधी आम्ही साडी घालून बघतो,तर कधी चित्र काढतो,कधी मनमोकळं करून नाचतो,तर कधी  वाढदिवस साजरा करतो,कुणी विणकाम करत,कुणी एकमेकांच्या वेण्या टाकून देतात,आम्ही तर केक बनवायला शिकलो आत्ता,आम्ही सगळे एकमेकांची खूप मस्करी करतो,यात आमचा 'शेरू' नावाचा एक कुत्रा मित्र सुद्धा बनला, तुम्हाला माहितीये उद्या आम्ही मातीपासून वेगवेगळ्या वस्तू बनवणार आहोत, निंबू चमचा खेळू, वेगवेगळ्या झाडाची पान तोडून त्याची आकार आम्ही वाहिवर काढू.

या सगळ्यात मी रोज नवीन शिकतेय, आजमध्ये जगायला शिकवतात ही मुलं.
आपण शाळेकडून,शिक्षकाकडून,प्रशासनाकडून अपेक्षा ठेवून वाट बघत बसून 6 महिने निघून गेली,आणि तरीही त्या प्रश्नच उत्तर मिळाले नाही की नेमक्या शाळा कधी चालू होणार,आणि जर झाल्या तर काळजावर दगड ठेवून मुलं शाळेत पाठवली जातील जशी मरणाच्याया खाईत स्वतः झोकून दिल्यासारखी.
हे सगळं अनुभवत असताना मूल शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून # गल्ली शाळा  हा उपक्रम आपण आपल्या एरिया मध्ये सुरू करावा असा मला वाटलं. आपल्या छोट्याश्या या पावलाने 4 मूळ शिकतात,अशीच जर आपल्यातला प्रत्येक युवक त्याच्या आजूबाजुच्या राहणाऱ्या ,आपल्या भावी भविष्याची जर 1 -2 तास जबाबदारी घेऊन त्याला शिक्षणापासून वंचित न राहण्यास योगदान करू शकत असेल तर कुठलेच आत्मनिर्भरतेचे नारे लावायची गरज भासणार नाही आपल्याला.शांतीत क्रांतीत होते आणि " बदलाची सुरुवात माझ्यापासून "  हे जर प्रत्येकानं आपल्या मणी गाठलं तर रोज येणार टेंशन कस गुल होईल हे कळणार सुद्धा नाही. आपली साजूक आहे की शिक्षण हे शाळेतच होत आणि शिक्षकाकडूनच ते होत,फार चुकीचा गैरसमज आहे आपला.  मुले शाळेत फक्त 7 तास राहतात बाकी पूर्ण वेळ 17 तास ती आपल्याबरोबर  असतात आणि यात ते संपूर्ण अनुकरण आपलं करतात,आजूबाच्या वातावरणातून ज्ञान घेतात, आणि आपण समजतो की ती फक्त आणि फक्त शाळेत शिकतात.आज ही 7 तासाची शाळेला कुलूप के लागलं आपण समजतोय की शिक्षणाचं थांबलं.

सर्वात मोठा आणि महत्वाचा प्रश्न जो मानवी मेंदू विचारतो,मला काय मिळणार यातून😀 मित्रा प्रयोग कर आणि प्रसाद घे,प्रयोग कर आणि उत्तर शोध. कदाचित माझ्या उत्तरापेक्षा तुझं उत्तर वेगळं राहील.💐

आज google हे मुलांचं बाप,youtube ही त्यांची माय,नेटफलिक्स सारखे अँप हे त्यांचे मित्र बनेल याआधी आपण बरीच छोटी छोटी उपक्रम सुरू केली पाहिजेत,माणसाला माणसापासून मिळणारा आनंद, सुख आणि समाधान हे एक device कधीच देऊ शकत नाही याची चांगली जाणीव आपण ठेवावी, शक्य झाल्यास मी या संपूर्ण कालावधीत काय सुंदर आणि योग्यता असलेलं आणि माझा विकास करणार काम केलं याच सुंदर उत्तर हे स्वतःला द्यायला आपल्याकडे असलच पाहिजे आणि आशा  करते ते आपल्याकडे असेल आणि मिळत नसल्यास आपण ते शोधू किंवा तयार करू🌻
           शिक्षण म्हणजे काय तर याच सुंदर उत्तर दिलेलं आहे एका व्यक्तींनी; शाळा आणि कॉलेज प्रवास संपल्यांनातर आपल्याकडे के उरल ,आपल्याला कोणती शिकवण आठवते,काय अनुभव हाती आला याचा आराखडा  जो निघतो तो म्हणजे शिक्षण. अर्थातच या दिवसात मग आपल्याकडे बरच काही शाळेविना -शिकायला आहे!💐

- Damini ($p@rk)




Comments

  1. Excellent work Damini 🍀😊👍
    Keep it up 🙏👍

    ReplyDelete
  2. दामिनी khup छान krty तू🙌🙌 keep it up

    ReplyDelete
  3. You always explore yourself in different way and I always meet with better version of my Dami .....good work dear keep going ✌️👌👌😊

    ReplyDelete
    Replies
    1. Thankyou dear.i would like to know ur name pls

      Delete
  4. great job damini खुप सुन्दर लेखन आहे

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

WAKT KI BAAT...WAKT KE HAAT...

वक्त की बात ...वक्त के हात ..

DIL KI BAT..

दिल की बात

SWABHIMAN...

स्वाभिमान मशख्खत तेरी गुमनाम है, मालूमात बकवास हुई, तेरा कोई वजूद नहीं तो तुज़ में वो बात नहीं। किस्से हज़ार है बारिश बेमिसाल हुई। पर तुझे मनाए कोई इतनी किसी को तेरी परवाह नहीं। कुछ हासिल हो तो ही तू है वरना तेरा होना किसी के लिए खास नहीं।  कुछ पा ले फिर बात कर नामुराद, अब तू किसी के लिए सौगात सही। जो हक है तेरा वो है तुझे पाना, खुदाई तेरी किसी खैरात की मोहताज नहीं।  ना समझ तू घमंड इसे, है तेरा स्वाभिमान यही। जब तक न कर ले कुछ हासिल तू, ना भूल की तेरा कोई वजूद नहीं, तुझ में वो बात नहीं। - Yogeshwari Bhoyar कलम वहीं, बाते भी वही, बस पहचान कुछ नहीं....

DARK NIGHT ..

DARK NIGHT

BHEDIYA ..

भेडिया

जीवन का एक अंग.......

तू जिंदगी का हिस्सा,  कोई माने  या  ना माने, तू हर कहानी का किस्सा..... कही डर तो कभी आपदा के नाम से तेरी पहचान, अल्फाज बदलते, भाव मात्र एक समान..... रहे तकरार, की तू कमजोरी की निशानी, ऐसी भूल ना करे कोई बुद्धि सयानी..... इस एक मात्र भय ने क्या खूब रंग दिखाए सच्चे-झूठे काम, समय समय करवाए... फिर पश्चाताप की कसोटी में तू खुद को आजमाएं बेलगाम दिमाग यादों के प्रभाव से उभर न पाए..... समय फिर नई घटनाएं नव अनुभव साथ लाये बीती बातों की परछाई पीछे छोड़ जाये.... वो साया भय का, सबब याद दिलाये सही गलत का सबक बेहतरी की ओर ले जाये.... तेरे हिम्मत की पहचान तुझे भय ने करवाई धैर्य की शीतलता पल पल सिखाई..... अंतता, मौजूदगी भयकी अनुशासन बढ़ाए, नैतिकता और मानवता से जीवन सजाए..... तू अस्तित्व भय का स्वीकार कर उठ, आगे बढ़ और हर चुनौती पार कर.... -Yogeshwari K Bhoyar

TARIF..

तारीफ

CHANGE IS LIFE...

CHANGE IS LIFE

ती

ती .. कोणाला नाही आवडत आपल बालपण.???  प्रत्येकजण बोलतेय,   लहानपण देगा देवा,  मुंगी साखरेचा रवा' पण, कुणी ते  बालपणच हिरावून घेतल तर.???  होय,  माझ बालपण हिरावलय...  बालपणात हरवलेली मी, किती सुंदर जग होते,  माझ्या स्वप्नाच्या दुनियेत आनंदाचे क्षण होते... ना कुठली चिंता,  ना कसली काळजी,  मनसोक्त खेळणे आणि स्वछंद भरारी... मी  बाबांची परी आणि आईची लाडली,  दादासोबत भांडत - खेळत प्रेमाने फुलली...  मित्र - मैत्रिणींसोबत जमलेली माझी गट्टी,  जणू हेच सर्व माझी विश्वनगरी...  परंतु,  एके दिवशी झाले असे,  मी चुकली वाट की नशिबच थोडे होते.???  जीवनातला तो शेवटचा काळा दिवस होता,  माझ्या मनाविरुद्ध सोबत घेऊन जात होता...  मी  शाळेच्या वाटेला निघाली,  मध्येच काका मला अडवी,  मला सोबत चालायला लावी...  मी नाही म्हटल्यावर मला उचलून घेई,  काय चुकी माझी,  सांगा ना कुणीतरी.???   आई ग,  ऐक ना,  तू रडू नकोस खुप घाबरली होती मी,  ओरडायला पण जागा उरली नव्हती,...

लोक-मत

'लोक-मत' " बोलावे मनमोकळे तर  किती तो बालिशपणा, आणि शांत राहण्याची करावी हुशारी तर  किती तो शिष्टपणा! नकारात्मकता डोक्यामधे  यांनीच नाही का भरावी, हे नसतील तर आयुष्याची गाडी  यशस्वी कशीच व्हावी! वागावे कसे यांच्याशी  हेच मला न कळे, परी ही दांभिक विचारसरणी काहीच लोक आचरे! 'लोकांच्या मताची' तर्हाच न्यारी चित भी मेरी और पट भी मेरी! "                                         ---मृणाली सोसे .