द्या मला धीर ...
चालता चालता दोन पाऊल
मागे पाहिलं वळून
धकाधिकच्या जीवनात तेवढं
जगायचं गेलं राहून
थोडा थकला मध्येच बसला
मागचं पुढचं विचार करत
स्वतशीच हसला
होत नव्हत सारे गेलं
शेवटी उरलेलं घरट ही
कुणीतरी नेल...
कोण तो कुणीतरी
आता विचारूच नका
माझ पण मलाच कळेना
कुणी देलं मला धोका
होती फाटली चप्पल पायात
फाटलेच होते पाय..
तरी स्वतःला धीर देऊन झालो
स्वतःचीच माय...
नुसता नुसता त्रास हा मलाच का हाय
कधी माझ्या नशिबी येणार दुधाची साय
राब राब राबून सुध्धा सुख काय न्हाय
फक्तं दोन वेळच खायला मिळाव तेच बास हा
कुणास सांगावी ह्या जीवनाची व्यथा
दुसऱ्यांना वेळ देण्याची आहे तरी का हो तुमची प्रथा.
जाता जाता एकच सांगेन देऊ नका हो खीर.
फक्त पाठीवर हाथ ठेवून द्याना मला धीर.
- निखील वासनिक
शाब्बास..... खूप छान....
ReplyDeleteभाऊ, टेन्शन नको घेऊ ... मी आहो न तुझ्यासोबत ..😉🙃
ReplyDeleteमस्त लिहलिय 👌👌💯💯💓
Hooo Re Bhai Khir Denar Ki Dhir🤣🙈
Deleteखूप सुंदर व्यक्त केलय निखिल...👌✌
ReplyDeleteThanks 🙈🙈
DeleteOoh hooo.... Mast aahe 👌👌👌
ReplyDeleteThanku🙈
DeleteBhari lihalay bhawa
ReplyDelete