मैत्री...!
खऱ्याखुऱ्या कुटुंबाबाहेर,
नवे कुटुंब बनविणारी..
दुनियादारीच्या विळख्यातही,
हक्काच माणूस देणारी........
शब्दांनी स्पष्ट होत नसली तरी,
कृतीतून व्यक्त होणारी..
सल्ले असो वा रुजवाद,
आवर्जून पुढे धजावणारी.......
गिले-शिकवे विसरून,
सगळ्यांना आपलंस करणारी..
कधी गोड, तर कधी तिखट
पण अविस्मरणीय अनुभव देणारी.....
आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनून,
त्याबरोबरच वाढत राहणारी...
अशी ही मैत्री,
हसवणारी, रडवनारी अन्
मनात रुजणारी!!
--मृणाली सोसे.
Khup chhan Mrunali 👌👌
ReplyDeleteHappy Friendship Day !! 🙂
Thanqq😇 n happy friendship day to you too😊
Delete