तुलाच तर चालायचंय ...
वाट असली जरी कठिन
तरी तुलाच चालयचय
मध्ये थकून सुध्धा
पुन्हा उठून तुलाच पळायचय
कधी वाटेल तुला हरल्यासारख
पण तुला स्वतः लाच जिंकून घायच्य
यशाच्या त्या उत्तुंग शिखरावर
तुलाच तर चढायचं
लोक बोलतील,तुला पाडतील
त्यांना सिध्द करून,
तुलाच तर दाखवायचं.
कधी शब्द नसतील तुझ्या कडे
पण कृतीत सुध्धा तुलाच तर आणायचं
वाटून स्वतचं दुःख स्वताशीच
स्वताशीच तर भांडायच
वाटल जर एकटं तुला
बघ स्वतः मधल्या स्वतःला
तुझा सोबती तुझ्यातच तर आहे
का जगामध्ये सोबती पाहे
एक फक्त लक्ष्यात ठेव
स्वतः मध्ये विश्वास ठेव
तूच आहे तुझा तारणहार
नको करू रे दुसऱ्यांच्या
विनवण्या फार
- निखील वासनिक
Nice poem Nikhil 👌👌👌
ReplyDeleteIt's true.... After all, jo kuch karna hota h, hame hi karna hota h...
There is no one, who will do all this for us... 👍👍