Skip to main content

TULA RAHIL NEHAMI MAZI SATH

 

तुला राहील नेहमी माझी साथ 


आभाळाला जशी सूर्याची साथ 
जंगलात मृगराजाची बरसात 

कोकिळेच्या गाण्यातला मधुर आवाज 
खोल समुद्रातील शिंपल्यांची कर्तबबाज 

वसंत ऋतूमधली हिरवडी
पाण्यावर खिळणारी सरोजकळी

उन्हाळ्यात उठणारा गुलमोहर 
युध्दात कमी झोपणारा लोहार

सैनिकाच्या खांद्यावरची बंदूक 
सावकाराच्या घरची संदूक 

घसरणाऱ्या म्हातार्‍याची काठी
गश्तीमध्ये पोलिसांची लाठी

सर्वांचा जसा एकमेकांना हात 
तसच तुला राहिल नेहमी माझी साथ 

- खुशाल भोयर 

Comments

Post a Comment