फुलपाखरू
गुलाबाच्या पंखुड़ीला बघून मनमोहितलेला एक वेळ फुलपाखरू
फुलांच्या संगतीत वाढ़लेल ते वेळपिसार फुलपाखरू
हसत, डोलत मजेत करामनुकी करत सतत उड़नार फुलपाखरू
लागताच भुक, तहान, झोप फूलांवरच विसावनार ते गोड फुलपाखरू
इवल्या- इवल्या भरारीत उन्हात चमचम चमकनार सोनेरी फुलपाखरू
भयभीत होताच शिकाऱ्यापासुन, पंख जोडून घाबरणार भित्र फुलपाखरू
रंगीबेरंगी रंगानी डोळ्यांना सुखावनार दर्शनीय फुलपाखरू
माझ्या स्वप्नात सुंदर घर करणार ते गोड गोड फुलपाखरू
- खुशाल भोयर
Comments
Post a Comment