आनंदाची व्याख्या
ओठावरचे हसू,
की डोळ्यातले अश्रू...
आनंदाची कोणती???
व्याख्या मी करू...
सूर्याचे तेज,
की चंद्राचा प्रकाश...
माझ्या मनासारखे पाहिजे,
हाच आहे अट्टाहास...
हिवाळ्यात ऊन,
देते आनंद...
उन्हाळ्यात हेच,
करते जेरबंद... !!!
उडणारे फुलपाखरू,
की गोजिरवाणे वासरू...
आनंदाची कोणती???
व्याख्या मी करू...
आयुष्यात हवे,
नात्याची साथ...
दुःखातून सावरतांना ,
मित्र पाहिजे खास...
मायेचा हात,
पाठिवरची थाप...
हेच माझ्यासाठी,
आनंद आहे खास...
कधी हे, कधी ते म्हणणारे,
मन हे आहे वेडे पार...
कधी फक्त तुझ्या असण्याने,
मला आनंद होतो फार...
आनंदाची व्याख्या,
कशी शब्दात करू...???
हे तर आहे माझ्या मनाचे,
गोंडस लेकरू...
ओठावरचे हसू,
की डोळ्यातले अश्रू...
आनंदाची कोणती???
व्याख्या मी करू...
- प्रांजली आष्टिकर
Comments
Post a Comment