ती .. कोणाला नाही आवडत आपल बालपण.??? प्रत्येकजण बोलतेय, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा' पण, कुणी ते बालपणच हिरावून घेतल तर.??? होय, माझ बालपण हिरावलय... बालपणात हरवलेली मी, किती सुंदर जग होते, माझ्या स्वप्नाच्या दुनियेत आनंदाचे क्षण होते... ना कुठली चिंता, ना कसली काळजी, मनसोक्त खेळणे आणि स्वछंद भरारी... मी बाबांची परी आणि आईची लाडली, दादासोबत भांडत - खेळत प्रेमाने फुलली... मित्र - मैत्रिणींसोबत जमलेली माझी गट्टी, जणू हेच सर्व माझी विश्वनगरी... परंतु, एके दिवशी झाले असे, मी चुकली वाट की नशिबच थोडे होते.??? जीवनातला तो शेवटचा काळा दिवस होता, माझ्या मनाविरुद्ध सोबत घेऊन जात होता... मी शाळेच्या वाटेला निघाली, मध्येच काका मला अडवी, मला सोबत चालायला लावी... मी नाही म्हटल्यावर मला उचलून घेई, काय चुकी माझी, सांगा ना कुणीतरी.??? आई ग, ऐक ना, तू रडू नकोस खुप घाबरली होती मी, ओरडायला पण जागा उरली नव्हती,...
True lines. Keep up the good work. You always show us the reality in your words.
ReplyDeleteThank U so much Amit😃😊
Delete