स्वामी विवेकानंद
सुर्याच तेज आणि चंद्राची शांती
विवेकानंदाची साऱ्या जगभर ख्याती
अफाट बुद्धिबळ आणि स्पष्ट वाणी
स्वामीच्या शब्दात होती विस्मयकारी क्रांती
नरेंद्रचा होता विद्या हाच केंद्रबिंदु
सळसळलेल्या रक्तात होता चक्रावती हिंदू
योगसाधनेच्या मार्गातला महान साधु
ब्रह्मचारी सदा, नाही आणली वधू
ईश्वराच्या शोधात केल्या घोर तपस्या
दर्शनात व्याकुल,गुरु परमहंसची समस्या
सिद्धिप्राप्त संताची जगभर भ्रमंती
पाश्चात्य लोकांनी दिली स्वामीला पसंती
सिद्धिप्राप्तीसाठी धार्मिकता हवी
संदेश त्यांचा पोहचला दारोदारी
३९ व्या वर्षीच सोडली जरी पृथ्वी
यशस्वी स्वामीनी आणली विश्वात युवाक्रांती !!
- खुशाल भोयर
👌👌👌👌🔥🔥🔥🔥
ReplyDelete