ओळ
स्वलिखित स्वमुखाने गायलेली ती ओळ
अंतरमनामध्ये खोलवर रुजवलीय तिने प्रेमाची मोड
कोण, कुठे, केव्हा, कसा भेटेल हे सोडवलय कोड नियतीच्या मार्गातल्या कथेचा हा एक प्रसंग गोड
तृप्तीमय झाला प्रकृतीचा आवार
मधुर स्वर जेव्हा झाले थाटामाटात कर्णावर सवार
सुखमय लाटांचा सुरु झाला जल्लोश जोरदार
उत्साहीत मनाने जेव्हा केली नृत्याची भेट मजेदार
साठलेल्या आठवणीत पडलीय ही एक आणखी भर कोणती ओळ आणेल सौख्य हा विचार झाला क्षणभर
पुन्हा ऐकाव ते गोड गीत घेऊनिया श्वास घुटभर
आणि सोडून दयावी समध्या जगाची काळजी घंटाभर
- खुशाल भोयर
Comments
Post a Comment