छोट्या छोट्या हातांनी,
कोणी बोट माझं धरणार का...???
कोवळ्या कोवळ्या आवाजाने,
कान माझे दुमदुमणार का...????
त्याच्या एका स्पर्शाने,
चोळी माझी भिजणार का...???
त्या मऊ गालांचा पापा,
कधी घ्यायला भेटणार का...???
हक्काची मायेची हाक,
कधी ऐकायला येणार का...???
माझ्या पोटाचा गोळा,
कधी हातात येणार का...???
सर्वांना हवे असलेले,
सुख मला भेटणार का...???
या जन्मात कधीतरी,
मी आई होऊ शकणार का...???
(कधी=कधीतरी)
-Pranjali Ashtikar
👏wow
ReplyDeleteThank U Prabhu😃😊
DeleteVery nice
ReplyDeleteThank U Dipu😃😊😘😘
DeleteIt's related to real life
ReplyDeleteYes, that's what I realized after working in gynae & obs.
DeleteIt's related to real life 😊
ReplyDeleteYes, indeed!!
DeleteThanks Dear😊😊😘
ReplyDelete