गत नाही समजण्याजोगी समध्यांच्या
दिसे नाही काळोख काबाडकष्ट शेतकऱ्यांचा
नेत्रहीन दीपक प्रज्वलित चोहीकडे
मोतीबिंदू स्वार, बघुनिया अंध, मज कळे !!
अठराविश्वे दारिद्र्य धमनीत साठूनी
पाठलाग सनातन पिढ्यानपिढ्या तव गाठूनी
तरी पोषणकर्ता दानशूर सतकर्मानी
भरी उदर विश्वनातलगांचे स्वतः उपाशी राहूनी !!
नेसतो फाटके धोतर सदरा ठिगरे चिकटवूनी
कांद्या भाकरीतच समाधान जगा पुरणपोळी भरवूनी
कर्जबाजारी ओळख कवडीमोल भाव घेऊनी
सोसेनासा भार, करी हल्का रडत फॉस्फेट खाऊनी !!
विसरू नका रे आहे तो जगाचा पोशिंदा
गरीब आहे म्हणुनी करू नका रे निंदा
उघडत कसे नाही रे डोळे तुमचे हे पाहुनी
कि करता बधिरनाट्य मरण किंचाळी ऐकुनी !!
- खुशाल भोयर
सुंदर....... 😊
ReplyDeleteThank you ��❤️
ReplyDeleteSplendid😍
ReplyDeleteThank you 😊💓
DeleteChan 💓💓💓
ReplyDeleteThank you bro ❤️😊😄
Delete👏👏👏👏
ReplyDelete