लहानपण देगा देवा, तवा साथी भाऊराया होता
खेळता त्याच्या संग दिसं कळत नव्हता
अम्रूताचा घास घाली , माझी काहानी ऐकता ऐकता
माझा आधार त्यो, दुसरा बापचं जसा
माझं दुखल जरास ,कि त्याचा जीव होई कसा बसा
देखना माझा भाऊ लाखात मिळणा असा
मोठा झाला अनं राखिला यायचचं राहिला
राग नाही मला त्याचा, वाट पाहायला लावुन गेला
आमचं इटुकल घर सोडून, भारत मातेचा झाला
सीमेवर मोठ्या हिरोवानी त्यो लढतों
त्याच्या काळजी पोटी माझा जीव भांड्यात पडतो
माझी आसवे पाहुन ,चिमुकलिच्याच सपनासाठी जातो असच म्हणतो
माझा भाऊ जगाचा राखींदा असा मना धीर देते
सगळ्यांचे भाऊ पाहून पार मन हे तुटते
चिठ्ठीची त्याच्या मी दिन-रात वाट पाहते
देवा मागते , माझं सगळं पुण्य त्याला देना
त्याला सांग कि साडी-चोळी घ्यायला मला बाजारात नेना
वाट पाहून थकल्या हाताना, हात द्याया राखीला तरी घरी येना
दादा राखीला तरी घरी येना
- Vaishnavi
Nice one Vaishnavi 👌👌🌼
ReplyDelete🤩🤩thank you
Delete