प्रिय सख्या,
डोळयात आहे आज एक वेगळीच चमक,
बोलुन दाखवायच्या ऐवजी घेतली हाथी कलम,
सांगायास आहे उत्सुक तुझ्यात रंगलेले माझे हे जीवन,
धडधड हृदयाची का वाढतेय प्रत्येक ओळीसोबत ...
स्वतःसोबत घेऊन आलास तू एक वेगळीच पहाट,
दूर केलेस तुने सगळे माझ्या जीवनातले अंधार,
तुझ्या असल्याने का जाणवत मला जिवंतपणा,
कसा बनलास रे तु माझ्या आयुष्यातला अमुल्य तारा..
बघितल्यावर तुला वाटते मला खुप छान,
बोलताना विसरतेय मी सगळं हरपून माझे भान,
फिरवता चोहीकडे नजर तुच दिसतोय रे,
कोणती जादू केलीस ज्याने मी झाली तुझी राधा रे ...
बहुदा उत्तर आहे सगळ्या प्रश्नांचे एकच खरे,
तुच आहे माझ्या प्रत्येक सुखाचा साथीदार,
आणि तुच आहे माझ्या प्रत्येक दुःखाचा भागीदार,
तुझ्यापासुन मी आहे,
तुझ्यापासुनच माझ सगळं जग आहे,
मी तुला आपलं मनापासून मानलय रे,
मग तु पण मला आपलं म्हणुन जन्मभर साथ देशील ना रे..
- तुझी सखी
Ohhh Bhai Is In Love😍😘
ReplyDeleteYaha "Bhai" ka sambodhan tuze suit karta hai 😅😂😂
DeleteKya baay h Khushal😃😀👌👌
ReplyDeleteLast line is clearly indicating.... U r proposing someone... 😉
Who is that someone....???