ये ना रे...
ये ना रे, जवळ ये जरा...
मिठीत आपल्या, धरून घे मला...
येऊ दे ना रे, तुझ्या कुशीत मला...
हळूच प्रेमाने, तू कुरवाळ मला...
नको बोलू काही, फक्त बघ मला...
जास्त काही नको, फक्त तू हवा...
चल ना माझ्यासोबत, जिथे असेल थंड हवा...
फक्त दोघे असू तिथे, आणि असेल शांतता...
तू बसला राहशील, कुशीत घेऊनी मला...
ऐकू येईल मला स्पष्ट, तुझ्या ह्रदयाचा ठोका...
आपल्या हातात, माझा हात घे जरा...
किती प्रेम करतो माझ्यावर, हे मला सांग जरा...
खूप काही नको, तुझा थोड़ा वेळ हवा...
देऊ शकशील का या जन्मी, साथ तू मला...???
-Pranjali Ashtikar
Wah wah 👏👏👏
ReplyDeleteDhanyavaad 😊🙏🙏
DeleteI need someone 🥺
DeletePoem😍
Ha Shraddha... Me tooo... 😅🤪
DeleteThanks 😊☺